भिगवण वार्ताहर.दि.24
पुणे सोलापूर महामार्गांवर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून काल एसटी ने ट्रेकटरने धडक दिल्याने दोघांचा जीव गेला तर आज संध्याकाळी 7 वाजता महामार्ग पोलीस चौकी समोर अज्ञात वाहनाने चिरडल्याने देव देवदर्शन करून घरी निघालेल्या भाविकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली.
याबाबत प्राथमिक मिळालेल्या नुसार अपघातात मुरलीधर बेंडाधूम रा.जांभुळपाडा जि. नाशिक यांचा जागीच मृत्यू झाला.पुणे सोलापूर महामार्गावरील डाळज येथील महामार्ग पोलीस चौकी समोर हा अपघात घडला.नाशिक येथून देवदर्शनासाठी गेलेल्या वाहनातील मुरलीधर हे लघु शंकेसाठी महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला गेले असता अज्ञात वाहणाने त्यांना धडक देऊन चिरडले.अपघात घडल्यावर झालेल्या आवाजामुळे काही पोलीस बाहेर आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.मृत व्यक्तीच्या खिशातील आधार कार्डामुळे त्याची ओळख झाली.यावेळी भिगवण शहरासाठी तसेच महामार्गासाठी वरदान ठरत असलेल्या आपुलकीची अम्ब्युलन्स सेवा यांच्या माध्यमातून मृत व्यक्तीचे पार्थिव शव विच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.यावेळी बोलताना केतन वाघ यांनी मृत व्यक्तीचा चिरडल्यामुळे अतिशय वाईट अवस्था झाल्याचे सांगितले.भिगवणं पोलीस अपघाताचा तपास करित आहेत.