विकास कामाच्या भूमिपूजनावरून तक्रारवाडी गावातील सत्ताधारी आणी विरोधक आमने सामने ; श्रेयवादाचे लोणं तालुका स्तरावरून गाव पातळीवर

0
1315

भिगवण वार्ताहर.दि.१३

तक्रारवाडी गावात विकास कामाच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजपा आणि विरोधक राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यात तू तू मै मै वाढली असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून महिला सरपंच यांची बदनामी केल्याचा आरोप माजी उपसरपंच प्रशांत वाघ यांनी केला.तर याबाबत माजी सरपंच सतीश वाघ यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता वेळ नसल्याचे सांगण्यात आले. मात्र शाशकीय निधीच्या मंजुरी वरून श्रेयवादाचे लोण जिल्हा तालुका स्तरावरून ते तक्रारवाडी सारख्या छोट्या गावातही पसरत असल्याचे यातून दिसून आले.

तक्रारवाडी गावात माजी मंत्री आणि तालुक्याचे आमदार दतात्रय भरणे यांच्या माध्यमातून ३० लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.निधी देणारे आमदार राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा हे दोघे सत्तेत सामील आहेत. त्यामुळे भाजपा गटाच्या सरपंच मनीषा वाघ यांनी भरणे यांच्या माध्यमातून आलेल्या विकास कामाची माहिती सर्व सदस्यांना देत भूपिपुजनाचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून विकासकामाचे भूमिपूजन केले.यावेळी सत्ताधारी सरपंच मनीषा वाघ ,
उपसरपंच आशाताई जगताप तसेच इतर असे ९ पैकी ६ सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते.मात्र भूमिपूजन कार्यक्रम स्थळी राष्ट्रवादीच्या सदस्यांना बोलाविण्यात आले नसल्याचा आरोप करीत काही कार्यकर्त्यांनी ग्रामसेवक दीपक बोरावके यांना प्रश्न विचारले तसेच यावेळी काही कार्यकर्त्यांनी भूमिपूजन कार्यक्रमाचा निषेध करीत दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि जि.प.सदस्य हनुमंत बंडगर आणी एकमेव विद्यमान सदस्य यांच्या उपस्थितीत प्रती उद्घाटन कार्यक्रम घेतला.यावेळी मदनवाडी भिगवण आणि परिसरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.मात्र विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमामुळे तक्रारवाडी गावात तणावाचे वातावरण पहावयास मिळाले.

याबाबत तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा वाघ यांनी विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी सर्व सदस्यांना निमंत्रित करण्यात आले असल्याचे सांगितले.तर निधी आमदार भरणे यांच्या माध्यमातून आला असला तरी सत्तेत भाजपा आहेच म्हणून भाजपच्या सरपंच म्हणून उद्घाटन करण्याचा मला अधिकार आहेच मात्र महिला सरपंच असल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी याचे राजकीय भांडवल करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला.हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी घटना नसल्याचे यावेळी त्यांनी खेदाने सांगितले.तर सोशल मिडीयावरून काही बदनामी कारक कमेंट केल्या आहेत त्यासबंधी कायदेशीर माहिती घेवून पुढे जाणार असल्याचे सांगितले.

याबाबत राष्ट्रवादीचे माजी सरपंच सतीश वाघ यांना संपर्क करून बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वेळेचे कारण देत बोलण्यास नकार दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here