बारामती भिगवण राज्यमार्गांवर झालेल्या अपघातात भिगवण येथील व्यवसायिकाचा जागीच मृत्यू ; अज्ञात वाहणाने दुचाकीला ठोकरल्यामुळे झाला अपघात

0
1783

भिगवण वार्ताहर.दि.२

बारामती भिगवण राज्यमार्गावर लामजेवाडी गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भिगवण बाजारपेठेतील व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

जोगेश नाथसाहेब पाचांगने वय ३२ असे अपघातात मृत झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.जोगेश सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भिगवण येथून आपल्या दुचाकीवरून बारामती कडे जात असताना हा अपघात घडला.अज्ञात वाहनाने ठोकरल्यामुळे जोगेश यांचा जागीच मृत्यू झाला.तर अपघातानंतर अपघात ग्रस्त वाहन निघून गेल्याची माहिती मिळत आहे.अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलीस तसेच अनेक तरुणांनी अपघात स्थळी धाव घेतली.जोगेश यांच्या मृत्यू मुळे भिगवण बाजारपेठेवर शोककळा पसरल्याचे दिसून आले.

बारामती भिगवण सिमेंट रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे.यातील एक बाजू काही अंशी तयार झाली असून दुसऱ्या बाजूचे काम चालू आहे.मात्र तयार झालेल्या सिंगल बाजूची पूर्वेची साईड पट्टी व्यवस्थित भरण्यात आलेली नाही त्यामुळे दुचाकी तसेच इतर वाहने खाली घेण्यास वाहन चालक धजावत नाहीत त्यामुळे अनेक अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे .याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.तर वाहन धारक गुळमुळीत रस्त्यावर सुसाट वेगाने वाहन चालवीत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे . 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here