ग्रामीण रुग्णालय भिगवणआणी वाहतूक नियंत्रक यांच्या माध्यमातून रोटरीचा स्तुत्य उपक्रम .
भिगवण वार्ताहर .दि. 11
रोटरी क्लब ऑफ भिगवण तसेच ग्रामीण रुग्णालय व वाहतूक नियंत्रक परिवहन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एस टी चे चालक व वाहक आणी प्रवाशी यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आहे आले. भिगवण बस स्थानक येथे घेण्यात आलेल्या या शिबिरात 100 च्या वरती नागरिकांची तपासणी करण्यात आली.
सकाळी 10 वाजता सुरु झालेल्या या शिबिरामध्ये शुगर तपासणी ,ब्लड प्रेशर या महत्वाच्या तपासण्या करण्यात आल्या.तर तपासणी नंतर घेण्यात येणारी खबरदारी तसेच आरोग्याविषयी सल्ला देण्यात आला.
यावेळी भिगवन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन विभुते ,वैद्यकीय अधिकारी डॉ विनायक देशपांडे डॉ अमोल खानावरे यांनी रुग्णांची तपासणी करून सल्ला दिला . तसेच अधिपरीचारिका रेश्मा निळे प्रियदर्शनी शिंदे जया गायकवाड लॅब टेक्निशन शिवांजली वाकळे यांनी तपासणी केल्या.
यावेळी सरपंच दीपिका क्षीरसागर , रोटरी अध्यक्ष रणजित भोंगळे ,रियाझ शेख ,तुषार क्षीरसागर , इंदापूर बस आगार चे डेपो मॅनेजर गोसावी यांनी भेट दिली.
यावेळी रोटरी अध्यक्ष् रणजीत भोंगळे यांनी दैनंदिन जीवनामध्ये एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने बस चालक व वाहक यांच्यावरील ताण वाढत आहे हे लक्षात घेता त्यांचं आरोग्य उत्तम राहावं या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगितले .
कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लबचे सर्व सदस्य व भिगवन बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक एन एम राऊत यांनी केले.