भिगवण वार्ताहर.दि.७
एक दोन नाही तर तब्बल ३६ वर्षांनी प्रगती विद्यालयातील वर्ग मित्रांनी एकत्र येत भिगवण येथील एका हॉटेल मध्ये स्नेह मेळावा आयोजित केला.अगदी वर्ग शिक्षकापासून सर्व शिक्षकांना सोबत घेत ३६ वर्षापूर्वीचा वर्ग परत भरविताना आपल्या भूतकाळातील आठवणींना उजाळा देण्याचे काम केले.
इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील प्रगती विद्यालयातील १९८७ च्या वर्ग मित्रांनी आपला स्नेह मेळावा भिगवण येथील उजनी हॉटेल प्रांगणात आयोजित केला होता.३६ वर्षापूर्वी अगदी हाफ शर्टपँनट मधील असणारे 45 विद्यार्थी आजच्या काळात कोणी नोकरी व्यवसाय शेती पारंगत असल्याचे यावेळी ओळखी दरम्यान दिसून आले. या स्नेह मेळाव्याची सुरवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. अत्यंत आपुलकी आणि आनंदाने भारावून गेलेल्या वातावरणात घेण्यात आलेल्या या मेळाव्यात माजी विद्यार्थी दिलावर तांबोळी ,शरद डोंगरे ,जयश्री सरडे,मंदा चव्हाण ,दशरथ रासकर या वर्ग मित्रांनी आपले मनोगत व्यक्त करीत ओळख करून दिली. वर्ग शिक्षक अशोक कोकरे यांनी सर्व विद्यार्थी मित्रांची आपुलकीने चौकशी करीत सुरु असलेल्या व्यवसाय नोकरीची माहिती जाणून घेतली.तर इतर शिक्षक विवेक शेटे , सतीश मगर ,हनुमंत गोसावी यांनी विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करीत नेहमी एकमेकांच्या सहवासात राहण्याचा सल्ला दिला.तर आपल्या पैकी काहीना जर मदतीचा हात हवा असेल तर तो इतरांनी मनापासून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.या स्नेह मेळाव्याचे आयोजन उज्वला देवकर ,दिलीप पिसाळ , मदन झोळ , दिलीप गायकवाड ,दशरथ रासकर, लक्ष्मण गोळे ,विजय गुणवरे ,संजय डुबल ,भाऊसाहेब यांनी, वामन राऊत यांनी केले.