तक्रारवाडी गावच्या सरपंच सतीश वाघ यांचा राजीनामा ; सरपंच पदासाठी 3 गटात चुरस

0
374

भिगवण वार्ताहर.दि.20

तक्रारवाडी गावच्या विद्यमान सरपंच सतीश विनायक वाघ यांनी राजीनामा दिल्याने रिकाम्या झालेल्या सरपंच पदासाठी चुरस निर्माण झाली आहे.सर्वसाधारण पदासाठी असणाऱ्या सरपंच खुर्चीसाठी गावातील तीनही गटांनी आपली ताकद वापरण्यास सुरवात केली असून विजयमाला कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे ओस्तुक्याचे ठरणार आहे.

इंदापूर तालुक्यातील राजकारणात नेहमी अग्रगण्य असणाऱ्या तक्रारवाडी गावातील ग्रामपंचायत निवडणूक २०२१ सालात पार पडली.गेली २० वर्षापासून माजी राज्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून असणारे गाव सर्वपक्षीय गटाच्या माध्यमातून निवडणूक लढवून ७ सदस्य निवडून आले.मात्र निवडणूक होताच निवडून आलेल्या सदस्यांमध्ये ” कोणता झेंडा घेवू हाती ? ” या विषयावरून फुट पडून ५ सदस्यांनी एकत्र येत सरपंच पद मिळविले.त्यामुळे गावात निवडून आलेल्यात २ आणि विरोधी १ असे एकूण ३ गट निर्माण झाले.सरपंच पदाची २ वर्ष पूर्ण झाल्याने सतीश विनायक वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत सहकारी सदस्यासाठी जागा मोकळी करून दिली.मात्र राजीनामा मंजूर होताच तीनही गटांनी आपली ताकद आजमविण्यास सुरवात केली असून यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे.सर्वसाधारण जागेसाठी पद मिळणार असल्यामुळे ३ गटातील महिला सदस्यांनी तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नागरिकांत आमदार दत्तात्रय भरणे यांचा समर्थक सरपंच होणार कि हर्षवर्धन पाटील यांचा समर्थक अशी चर्चा रंगत असल्याचे दिसून येत आहे.मात्र कोणीही सरपंच झाला तरी स्वताच्या ऐवजी गावाचा विकास व्हावा अशी मागणी ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे.

याबाबत तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश वाघ यांच्याशी संपर्क साधला असता इतर सदस्यांना पदाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आपण राजीनामा दिला असल्याचे सांगितले.तर गावच्या विकासासाठी आपण यापुढेही सर्व सदस्यांना सोबत घेवून कामकाज पाहणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here