भिगवण वार्ताहर .दि.२८
जगाचा अधीप्रवासी असणाऱ्या सूर्यदेवतेचा दक्षिणायन आणि उत्तरायण प्रवास सुरु असणाऱ्या रथ सप्तमीचे निम्मित साधीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य ,भिगवण पोलीस ठाणे ,परिवहन विभाग बारामती तसेच इंदापूर राज्यपरिवहन आगाराच्या वतीने पुणे सोलापूर महामार्गावर बस मधील प्रवाश्यांचे तिळगुळ आणि गुलाबपुष्प देवून स्वागत करीत प्रवासी दिन साजरा करण्यात आला.
नागरिकांनी प्रवास करताना खासगी वाहतुकीच्या ऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय अंगीकारावा तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारावी. यासाठी ग्राहक पंचायत पुणे यांच्यावतीने हा कार्यक्रम राबविण्यात आला.यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार ,मोटार वाहन निरीक्षक धैर्यशील लोंढे ,हर्षदा खारतोडे , ग्राहक पंचायतीचे महाराष्ट्र राज्य सचिव तुषार झेंडेपाटील, जिल्हा ग्राहक संरक्षण सदस्य दिलावर तांबोळी , प्रवासी महासंघाचे नंदकुमार तावरे ,राजेंद्र निंबाळकर, लालासो साळुंखें तसेच रा.प.वाहतूक नियंत्रक नंदकुमार राउत हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.यावेळी पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवास करणाऱ्या सोलापूर भोर एस.टी बसला थांबवून या गाडीचे चालक आणि वाहक यांचा फेटा बांधून सत्कार करीत बस मधील प्रवाशी यांना पाणी बाटली तसेच तिळगूळ तसेच गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.
पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी एसटीबस मधील प्रवासी यांचे स्वागत करीत बसने प्रवास केल्याने देशाचे आर्थिक गणित सुधारण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.तसेच देशातील नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेतल्यास अपघात प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तुषार क्षीरसागर ,डॉ.प्रशांत चवरे ,आप्पासाहेब गायकवाड ,योगेश चव्हाण ,नवनाथ सावंत ,विजयकुमार गायकवाड ,नारायण मोरे उपस्थित होते.