इंदापूर तालुक्यातील भादलवाडी गावातील प्रकार ; सरपंच पदाचा गैरवापर करत घेतला होता ग्रामसभेत ठराव .
भिगवण वार्ताहर.दि.२७
भादलवाडी गावच्या महिला पोलीस पाटील तनुजा कुताळ यांच्या विरोधात गर्दी जमवून त्यांचे पद रद्द करण्याची मागणी करणाऱ्या तत्कालीन सरपंच राणी कन्हेरकर आणि इतर दोघांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे पदाचा गैरवापर करीत गावातील वातावरण दुषित होवून महिला पोलीस पाटील यांची प्रतिमा मलीन करणार्याना चांगलाच धडा मिळाल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि २१/०८/२०१८ रोजी भादलवाडी गावात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तत्कालीन सरपंच राणी भगवान कन्हेरकर यांनी तसेच त्यांच्या सोबत असणाऱ्या काहीनी पोलीस पाटील कुताळ यांच्यावर खोटेनाटे आरोप करीत त्यांच्या पद्द रद्द करावे असा बेकायदेशीर ठराव घेतला होता. तसेच १४ /०९/२०१८ विभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करीत पद्द रद्द करण्याची मागणी केली होती.मात्र विभागीय कार्यालयाकडून हा अर्ज फेटाळण्यात आला होता.यातून आपली प्रतिमा मलीन झाल्यामुळे पोलीस पाटील कुताळ यांनी इंदापूर न्यायालयात धाव घेत बाजू मांडली होती.त्याच अनुष्ण्घाने न्यायलयाने तत्कालीन सरपंच राणी कन्हेरकर ,योगेश कदम ,काकासाहेब कन्हेरकर यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तत्कालीन सरपंच राणी कन्हेरकर यांनी या आदेशाविरोधात बारामती न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करीत यातून आपले नाव वगळण्याची मागणी केली होती.मात्र त्यातही त्यांना दिलासा न मिळत त्यांची याचिका फेटाळण्यात आली आहे.
याबाबत पोलीस पाटील तनुजा कुताळ यांनी सबंधित व्यक्तींनी आमची मोठ्या प्रमाणावर बदनामी केली होती.पदाचा गैरवापर करीत ठराव घेतले होते.पण आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्यामुळे अखेर सत्याचा विजय झाला असल्याचे सांगितले.न्यायालयात कुताळ यांची बाजू प्रसिद्ध वकील सचिन वाघ यांनी बाजू मांडीत न्याय मिळवून दिला.