भिगवण वार्ताहर .दि .२१
भिगवण (ता इंदापूर) येथील पल्लवी सोनोने यांचा अभिनय क्षेत्रातील मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
अभिनेत्री सोनोने यांना महिला दिनानिमित्त भारत इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल च्या वतीने वूमन सिनेमा अँड आर्टस इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने तावशी येथील जाहीर कार्यक्रमात सोनोने यांना भरणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांचेसमवेत लागीर झाल जी फेम कल्याणी सोनोने -चौधरी यांचा ही सन्मान केला.कल्याणी सोनोने आणि पल्लवी या दोघी बहिणी असून त्या भिगवण सारख्या ग्रामीण भागातील रहिवासी आहेत . यावेळी सचिन बोगावत, आण्णा धवडे,अजिंक्य माडगे,प्रमोद बंडगर, मनोज राक्षे आदी उपस्थित होते.
मनोरंजन क्षेत्रात काहीही संबंध नसणाऱ्या सर्व सामान्य कुटुंबातील पल्लवी सोनाने व कल्याणी सोनोने या सख्या बहिणींनी कला क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी बजावली.त्या दोघींनी आपल्या कर्तुत्ववान कामगिरी ने इंदापूर तालुक्याचे नाव देशात झळकवण्याचे काम केले आहे असे, अशा शब्दात राज्यमंत्री भरणे यांनी त्यांचे कौतुक केले .
Home महत्वाच्या बातम्या इंदापूर अभिनेत्री पल्लवी सोनोने यांचा राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते सन्मान ; तावशी येथील...