भिगवण वार्ताहर .दि.१२
भिगवण परिसरात सर्वसामान्य व्यापारी आणि गरजूंना तातडीच्या आर्थिक कारणासाठी संजीवनी ठरणाऱ्या श्रीनाथ ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.काळे यांनी दिली. १३ जागांकरिता घेण्यात आलेल्या निवडणुकीत १३ अर्ज आल्याने हि घोषणा करण्यात आली.
इंदापूर तालुक्यात नावलौकिक असणाऱ्या आणि सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या या श्रीनाथ पतसंस्थेची स्थापना भिगवण गावाचे विकासरत्न म्हणून ओळख असणाऱ्या दिवंगत रमेशराव जाधव यांनी केली होती.छोटे व्यावसायिक आणि गरजू शेतकरी तसेच आणि कामगार यांना त्यांनी निर्माण केलेल्या पत विचारात घेवून त्यांना लागणाऱ्या कर्जाची सोय व्हावी यासाठी २१ वर्षापूर्वी हि स्थापन करण्यात आली. यातील १९ वर्ष अध्यक्ष म्हणून रमेशराव जाधव यांनी कार्यभार पाहिला.त्यांच्या अचानक जाण्यामुळे पाठीमागील २ वर्षापासून त्यांचे सुपुत्र पराग जाधव जबाबदारी पडली होती.तर २०२२ ते २०२७ ची निवडणूक घेण्यात आली .यात १३ सदस्यांनी आपले अर्ज दाखल केले.पराग रमेशराव जाधव ,रवींद्र वांझखडे ,खंडू गाडे ,मुकेश ललवाणी ,रत्नाकर थोरात सलीम सय्यद ,प्रल्हाद काळे ,रोहन जाधव यांनी सर्वसाधारण जागेसाठी तर महिला प्रतिनिधी जागेसाठी तृप्ती जाधव ,प्रमिला जाधव यांनी तर इतर जागांसाठी अनिल देसाई ,शिवाजी गुंजाळ तसेच देवानंद शेलार यांनी अर्ज दाखल केले. एकूण १३ जागांसाठी १३ अर्ज दाखल करण्यात आल्याने हि निवड बिनविरोध घोषित करण्यात आली.
यावेळी संस्थेचे व्यवस्थापक सचिन मदने ,रोखपाल संतोष लिमकर ,मनीषा ढेरे ,पद्माकर कदम ,विजयकुमार गायकवाड ,सचिन जाधव ,बाळासाहेब क्षीरसागर ,उदय जाधव तसेच इतर कर्मचारी यांच्या वतीने नवनिर्वाचित मंडळाचा सत्कार करण्यात आला.
“ भिगवण परिसरात काही वर्षापूर्वी अनेक पतसंस्था उदयाला आल्या होत्या त्यातील काहीच पतसंस्था आज चालू असलेल्या दिसतात तर अनेक पतसंस्था गोरगरीब ठेवीदाराचे पैसे गुंडाळून बंद झालेल्या आहेत.चेअरमन पदावर असणाऱ्या व्यक्ती आणि काही ठिकाणी कर्मचारी यांनी हेराफेरी आणि झगमगाटावर बेमाप खर्च करीत पतसंस्था डबघाईला आणल्या.मात्र श्रीनाथ संस्थेनी आपला आलेख नेहमी उंचावीत ठेवला. सतत अ वर्ग असानार्या या पतसंस्थेची वार्षिक उलाढाल २० कोटी रुपयांची आहे . ”