भिगवण वार्ताहर .दि . २७
रोटरी क्लब ऑफ भिगवन तसेच रोटरी क्लब ऑफ बिबेवाडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भिगवण येथील दिव्यांग युवक पप्पू जाधव यास व्हीलचेअर भेट देण्यात आली. यावेळी रोटरी अध्यक्ष संजय खाडे तसेच इतर रोटरीचे सदस्य उपस्थित होते .
भिगवण विरवाडी येथील जाधव यास दिव्यांग असलेल्या कारणामुळे दैनंदिन जीवनामध्ये खुप अडचणीचा सामना करावा लागत होता .तर घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे व्हीलचेअर घेण्यासाठी पैशाची व्यवस्था करता येत नव्हती .या कारणामुळे जागेला खिळून राहावे लागत होते .याची माहिती देत रोटरी क्लब आणि माजी अध्यक्ष संपतराव बंडगर यांच्याकडे त्यांनी व्हीलचेअरची मागणी केली होती .त्यांच्या मागणीचा प्रामुख्याने विचार करीत रोटरी क्लबच्या माध्यमातून जाधव यांची व्हीलचेअरची मागणी पूर्ण करण्यात आली. व्हीलचेअर मिळाली असल्याने लाभार्थी पप्पू जाधव यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते .
यावेळी रोटरीचे अध्यक्ष संजय खाडे उपाध्यक्ष औदुंबर हुलगे , संपत बंडगर ,स्वप्निल ढोले तसेच भिगवण रोटरीचे सर्व सद्स्य उपस्थित होते. व्हीलचेअर मिळाल्याबद्दल पप्पू जाधव तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी रोटरी क्लबचे आभार मानले
.यावेळी बोलताना रोटरीच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे करीत असताना भिगवण आणि परिसरातील दिव्यांग व्यक्तींना सेवा उपलब्ध व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे खाडे यांनी सांगितले .