पोंधवडी गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते नारायण बंडगर यांची बिनविरोध निवड .

0
168

भिगवण वार्ताहर.दि.२९

पोंधवडी गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदावर सामाजिक कार्यकर्ते नारायण माहादेव बंडगर याची निवड सर्वानुमते करण्यात आली.गावचे सरपंच लक्ष्मण पवार यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पोंधवडी गाव हे गेल्या काही दिवसात तक्रारीचा वाढता आलेख असणारे गाव म्हणून ओळख निर्माण करीत आहे.त्यातच राजकीय सत्ताबदलाच्या वाऱ्यामुळे गावातील वातवरण गरम राहत असल्याचे दिसून येत होते.तर गावातील तंटामुक्ती अध्यक्षाचे पद खाली असल्यामुळे पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारींना पेव फुटले होते.त्यामुळे सत्ता बदल होताच सरपंचाच्या अध्यक्षतेखाली हि निवड बिनविरोध करण्यात आली.यावेळी मार्गदर्शक दतात्रय पवार ,उपसरपंच प्रतिनिधी प्रदीप बंडगर ,गणेश पवार ,ज्ञानदेव बंडगर ,संभाजी कोकरे ,तुळशीराम खारतोडे ,आण्णा बंडगर ,भागवत बंडगर ,दादा काशीद ,संजय भोसले पोलीस पाटील शामल पवार उपस्थित होते.निवडी नंतर मनोगत व्यक्त करताना नारायण बंडगर यांनी गावातील तंटे पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वी सामंजस्याने मिटविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here