भिगवण वार्ताहर.दि.१७
भिगवण पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या लामजेवाडी गावात चोरट्यांनी मध्यरात्री सुमारास दाराची कडे कोयंडे उचाकाटीत १ लाख ७७ हजार रुपयाचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली. हिंदी बोलणाऱ्या या चोरट्यांनी घरमालकाला कोयत्याचा धाक दाखवून हि चोरी केल्यामुळे ग्रामीण भागात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार लामजेवाडी येथील विनायक प्रकाश शेलार यांच्या घरी हि चोरी झाली आहे. १६ तारखेच्या मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास तीन चोरट्यांनी शेलार याच्या घराचे दरवाजे ढकलून आणि कडी कोयडे उचाकातून घरात प्रवेश केला यावेळी जागे झालेल्या शेलार आणि त्यांच्या पत्नीच्या तोंडावर बॅटरी चा फोकस मारीत कोयत्या सारखे धारदार शस्त्र दाखवीत ‘ लेटके रहो सो जावो हिलो मत हमको तकलीफ तो तुमको भी तकलीफ ’ असे दरडावून फिर्यादी आणि त्यांची पत्नी यांना बेड वर झोपण्यास सांगून त्यांच्या अंगावर ब्लॅनकेट टाकले .यावेळी घरात असणाऱ्या कपाटाचे दरवाजे उचकाटून यातील सोने चांदीचे दागिने ,१९००० रोख रक्कम आणि मोबाईल असे जवळपास १ लाख ७७ हजार रुपयाचा ऐवज लुटून नेला. जीविताला असणारा धोका आणि घरातील सदस्यांना त्रास होवू नये यासाठी फिर्यादी यांनी भीतीपोटी झोपून राहून चोरटे निघून गेल्यावर हा प्रकार इतरांना सांगितला.
दसरा दिवाळीचा सन आणि उस तोडीचा हंगाम सुरु होताच चोरीच्या घटनात वाढ होत असल्याचे दिसून येत असल्यामुळे गावागावात ग्राम सुरक्षादलाची निर्मिती करून चोरीला आळां घालण्याचे काम पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे.तसेच पोलिसांच्या पेट्रोलिंग मघ्ये वाढ करण्यात आली असल्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी सांगितले.