भिगवण वार्ताहर.दि.१४
भिगवण राशीन रोडवर रात्रीच्या सुमारास पायी चालणाऱ्या इसमाला दुचाकीने धडक दिल्याने यात सदर इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार १० तारखेला रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला .हा अपघात करणारा अनोळखी दुचाकीस्वार अपघात ग्रस्ताला मदत न करता घटना स्थळावरून पसार झाला .सदर अपघातास जबाबदार असणाऱ्या दुचाकी स्वराची तसेच जीव गमावलेल्या अनोळखी माणसाची ओळख पटविण्याचे काम भिगवण पोलीस करीत आहेत.सदर मयताच्या अंगावर निळ्या रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची साधी पँन्ट आहे.सदर मयताचे डोक्यावरील केस पांढऱ्या रंगाचे असून याचे अंदाजे वय ४० असण्याची शक्यता आहे.सदर मयत इसम तसेच अपघात करणारा दुचाकी स्वार यांच्याबाबतची कोणतीही माहिती असल्यास भिगवण पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. भिगवण पोलीस ठाण्याच्या ०२११८२४६२३३ या फोनवर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याची माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी दिली.