भिगवण परिसरात समाधान कारक पाऊस ; लवकरच गाठणार सरासरी

0
125

भिगवण वार्ताहर .दि.२

भिगवण परिसरात अनेक दिवसापासून केली जाणारी पावसाची  प्रतीक्षा काही प्रमाणात पूर्ण झाली असल्याचे शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे दिसून आले.जवळपास दोन तास पडणाऱ्या पावसाने बळीराजा सुखावला असल्याचे दिसून आले. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या या पावसाची ६६ मिलीमीटर नोंद झाल्याची माहिती ग्रामीण विकास केंद्राचे कृषी सहायक देविदास फलफले यांनी दिली.

राज्यात अनेक ठिकाणी थैमान घालीत पूर आणणाऱ्या वरुण राजाने भिगवण आणि परिसरावर मात्र तिरकी नजर केल्याचे वाटत होते. धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे उजनी धरण भरण्याच्या दिशेने वाटचाल करीत असले तरी भिगवण आणि परिसरात मात्र सरासरीच्या आकड्याला गाठताना अनेक दिवसांची वाट बळीराजाला पाहावी लागली होती.मात्र शुक्रवारी झालेल्या पावसामुळे परत आशा पल्लवित झाल्या असून आजून दोन चार पावसामुळे सरासरी ओलांडली जाण्याच्या मार्ग मोकळा झालेला आहे . काल रात्री जवळपास २ तास पडणाऱ्या पावसाची ६६ मिलीमीटर नोंद करण्यात आली. भिगवण परिसरात सरासरी  ४२० मिलीमीटर पावसाची नोंद आहे.तर चालू मोसमात आजपर्यंत ४१२.१०० मिलीमीटर नोंद घेण्यात आली आहे. गेल्या वर्षातील झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने सर्व सरासरीला पाठीमागे टाकीत ९७५ इतक्या विक्रमाची नोंद केली आहे.तर २००२ ,२०१२ आणि २०१६ साली २०० मिलीमीटर इतका कमी पावसाच्या आठवणी बळीराजाला सतावित आहेत.त्यामुळे राहिलेल्या मोसमात पाऊस कोणता विक्रम करतो याच्याकडे बळीराजा आणि व्यापारी वर्ग डोळा लावून बसला असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here