भिगवण वार्ताहर.दि.२७
भादलवाडी येथील १९ वर्षाच्या नवतरुणांने गळफास घेत जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना रविवारी संध्याकाळी ८ सुमारास घडली. शांत आणि समंजस तरुणाच्या आतातायी निर्णयामुळे भादलवाडी गावावर शोककळा पसरल्याचे दिसून आले.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार अभिषेक रामकृष्ण एकाळे वय १९ असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात श्रीक्रुष्ण महादेव एकाळे यांनी खबर दिली असून भिगवण पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.रविवारी संध्याकाळी श्रीकृष्ण आपल्या कामावरून घरी आले असता त्यांना पत्र्याच्या खोलीत लोखंडी अँगल नायलॉन दोरीच्या आधारे अभिषेकने गळफास घेतल्याचे दिसून आले.यावेळी तातडीने आरडाओरडा करीत नातेवाईकांना बोलावून अभिषेकला खाली घेत उपचारासाठी भिगवण येथील खासगी आय.सी.यु दवाखान्यात आणण्यात आले.मात्र यावेळी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी इंदापूर जिल्हा रुग्णालयात पाठविले.
याबाबत भिगवण पोलीस पुढील तपास करत असून मृत्यू पूर्वी सुसाईड नोट मध्ये पोटाच्या आजारामुळे आपण आपला जीव देत असल्याची माहिती मिळत आहे.मात्र नवयुवकाने घेतलेल्या निर्णयामुळे नातेवाईकांना दुखाचा सामना करण्याची वेळ आली आहे.