मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज इंदापूर यांच्या वतीने भिगवण पोलीस ठाण्यात देण्यात आले निवेदन .जाब विचारणाऱ्या तरुणा विरोधातील गुन्हे मागे घेण्याची मागणी गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा
भिगवण वार्ताहर. दि.२६
लोणी देवकर (ता. इंदापूर) येथील जिंदाल इंडस्ट्रीजचा मालक अशोक जिंदाल याने छ्त्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल अपशब्द वापरले प्रकरणी त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करीत भिगवण येथील मराठा क्रांती आणि सकल मराठा वतीने भिगवण पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.तसेच या प्रकरणी जिंदाल याला जाब विचारणार्या शिवप्रमींवर दाखल केलेला गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
उद्योगपती अशोक जिंदाल याने छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या बाबत अपशब्द वापरलेची व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झालेली होती. याबाबत काही तरुणांनी संबंधित अशोक जिंदाल यास जाब विचारला होता. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी उद्योपतीच्या सांगण्यावरून सत्यता न तपासता एकाच घटनेचे दोन गुन्हे दाखल केले. एका गुन्ह्याप्रकरणी मा. न्यायालयाने जामीन दिलेला असतानाही पोलिसांच्याद्वारे बेकायदेशिरपणे डांबून ठेवण्यात आले, असे निवेदनात म्हटले आहे.
याप्रकरणी सदर उद्योगपतीवर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता असताना तरुणांच्यावर गुन्हा दाखल होणे योग्य नाही हे गुन्हे तात्काळ मागे घ्या अन्यथा आंदोलनाचा मार्ग निवडावा लागेल अशा इशारा यावेळी बोलताना अॅंड. पांडुरंग जगताप यांनी दिला.भिगवण पोलिसांच्या वतीने जीवन माने यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष राजकुमार मस्कर, छत्रपती वाचनालयाचे अध्यक्ष अॅंड पांडुरंग जगताप, माजी सरपंच पराग जाधव, दीनानाथ मारणे ,तुषार चव्हाण, अमितकुमार वाघ, अॅंड. कन्हय्या पहाणे, विशाल धुमाळ, हर्षवर्धन ढवळे तसेच मदनवाडी तक्रारवाडी भिगवण रेल्वे स्टेशन डिकसळ येथील मराठा बांधव उपस्थित होते.