उपकेंद्र तक्रारवाडी आणि हिंद महालॅब यांचा कौतुकास्पद उपक्रम…
भिगवण वार्ताहर . दि.२२
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उप केंद्र तक्रारवाडी यांच्या मघ्यमातून भिगवन पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली. उपकेंद्राच्या समुदाय अधिकारी डॉ.मृदुला जगताप यांनी हिंद महालॅब यांच्या सहकार्यातून ही तपासणी केली.
कोरोना आजाराचा काळात सर्व सामान्य नागरिक घरात बसून आहेत .मात्र दिवस रात्र सेवा बजावित नागरिकांना आजारापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरून बंदोबस्ताचे कार्य पार पाडत आहेत.सर्व सामान्य नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ते आपल्या आरोग्याकडे पाहिजे तेवढे लक्ष देताना दिसून येत नाहीत.याचाच विचार करून तक्रारवाडी उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप भगत यांनी पोलिसांच्या आरोग्याची तपासणी करण्याचा मानस भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी जीवन माने यांच्या समोर व्यक्त केला.याला माने यांनी लगेचच परवानगी दिली.या कामी त्यांनी हिंद महालॅब चे सहकार्य घेत उपकेंद्रातील आरोग्य सेविका आणि कर्मचारी यांच्या मदतीने डॉ.जगताप यांनी पोलीस ठाण्याच्या इमारतीत सर्व पोलीस महिला पोलीस आणि होमगार्ड यांच्या रक्ताचे नमुंने जमा केले.या रक्त तपासणीत सी बी सी , डी . डायमर ,बीएस .एल ,थाईराईड ,सी आर पी यांची तपासणी करण्यात आली.यावेळी उप केंद्राच्या आरोग्य सहायिका रेणुका जाधव , आरोग्य सेविका उषा यादव ,सीमा मारकड लॅब टेक्नशियन घनशाम जाधव यांनी विशेष सहकार्य केले.उपकेंद्राच्या माध्यमातुन पार पडलेल्या उपक्रमात सर्व पोलिसांनी सहभाग घेत आपले आरोग्य तपासणी करून घेतली.
यावेळी बोलताना पोलीस अधिकारी जीवन माने यांनी उपकेंद्र तक्रारवाडी यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी उपक्रमाचे स्वागत केले.पोलीस नेहमी बंदोबस्त आणि नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून आपल्या आरोग्य कडे काहीसे दुर्लक्ष करतो. मात्र अशा उपक्रमामुळे पोलिसांचे आरोग्य समजून घ्यायला मदत होईल.
उप केंद्राचे आरोग्य अधिकारी आरोग्य सेविका कर्मचारी आणि हिंद महा लॅब यांचे पोलिसांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.