कोरोणाच्या काळात घरदार सोडून आपल्या जीवाची काळजी न करतां सेवा देणाऱ्या आरोग्य दुताप्रती पार पाडली जातेय सामाजिक जबाबदारी …ध्क्ष््््््
भिगवण वार्ताहर . दि..२२
कोरोना सारख्या महामारीच्या काळात घर परिवार सोडून स्वतःच्या जीवाची काळजी न करता अहोरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर ,आरोग्य सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या साठी भिगवण रोटरी क्लब आहारदुत ठरत असल्याचे दिसून येत आहे .याच रोटरी क्लबच्या माध्यमातून एप्रिल महिन्यापासुन कोवीड सेंटर मधील डॉक्टर आणि नर्सेस यांना सकस आहार देण्याची योजना सुरु केली असल्याची माहिती अध्यक्ष संपत बंडगर यांनी दिली.
भिगवण येथील कोवीड सेंटर मधील नित्यनियमाने होणाऱ्या या आहार वाटपाच्या कार्यक्रमावेळी रोटरीचे अध्यक्ष संपत बंडगर,सचिन बोगावत,वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत शहा ,डॉ.समीर शेख,डॉ.कैलास व्यवहारे ,डॉ.गणेश पवार,डॉ.अमोल खानावरे,आरोग्य सेविका ,आरोग्य कर्मचारी ,संजय चौधरी,रियाज शेख,रणजित भोंगळे,संतोष सवाणे,औदुंबर हुलगे,प्रवीण वाघ,संजय खाडे,किरण रायसोनी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष संपत बंडगर यांनी आपल्या देशात कोरोना सारख्या महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जनजीवन सगळे कोलमडुन गेले आहे. हातात काम नाही आणि घराबाहेर पडल्यास कोरोना घरात येतोय अशी अवस्था सर्वसामान्य लोकांची झाली आहे.
शासनस्तरावरुन कोरोना रुग्णालयात डॉक्टर,आरोग्य कर्मचारी अहोरात्र रुग्णाची सेवा करीत आहे. शासनाने सीसीसी आणि डीसीएच सेंटर सुरु करुन रुग्णालयात रुग्णांसाठी मोफत आहार आणि मोफत औषधोपचार करीत आहे.मात्र जीवाची बाजी लावून अहोरात्र सेवा करणाऱ्या आरोग्य दुतांच्या
सकस आहाराबाबत काहीसा विचार होताना दिसून येत नाही याच बाबींचा विचार करीत आम्ही भिगवण मधील रोटरी क्लबच्या माध्यमातून ही सकस आहार योजना सुरू केली.कोरोना रुग्णाची सेवा करीत असताना डॉक्टर आणि नर्सेस यांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी शेंगदाना चिक्की,फळे आणि उकडलेली अंडी अशाप्रकारे सकस आहार देण्याबाबतची योजना एप्रिल पासुन सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी रोजचा पंधराशे रुपये खर्च येत आहे.मात्र याची जुळवणी क्लब सदस्या कडून केली जात आहे .
कोरोना सेंटर मधील रुग्णालयात सकस आहार मिळाल्याने कोरोना डॉक्टर आणि नर्सेस यांच्या चेहऱ्यावर पहावयास मिळणाराआनंद हा आमच्यासाठी लाखमोलाचा असल्याचे रोटरीच्या सदस्यांच्या वतीने सांगण्यात आले.