आंदोलन चिघळण्याची शक्यता . सोलापूर लोकप्रतिनिधींना जिल्हा बंदी केली जाणार असल्याचे आंदोलकांचा इशारा
भिगवण वार्ताहर. दि.२१
इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी पुणे व पिंपरी- चिंचवड शहरातील उजनी जलाशयामध्ये येणारे ५ टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुका साठी देण्याचे मंजूर करण्यात आले होते . सोलापूर भागातील लोक प्रतिनिधी यांनी घातलेल्या खोड्या मुळे जयंत पाटील यांनी तो निर्णय रद्द केल्याचे जाहीर केले. तेव्हापासून इंदापूर तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलने होत असून भिगवण याठिकाणी शेतकरी संघर्ष कृती समितीच्य वतीने सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या विरोधात बारामती नगर रस्ता रोखून आंदोलन करण्यात आले. रस्ता रोको बरोबरच ,जोडेमार आंदोलन आणि निषेधार्त मुंडण करण्यात आले.
यावेळी ” पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचे ,कोण म्हणतं देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही ” अशा घोषणा देण्यात आल्या .तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या तसेच सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीचा निषेध करण्यात आला.तसेच सोलापूरच्या लोक प्रतिनिधिचा प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले.यावेळी शेतकऱ्यांनी मुंडण करीत पाणी निर्णय बाबत निषेध करण्यात आला.
यावेळी हनुमंत बंडगर ,शरद चीतारे ,विष्णू देवकाते ,सचिन बोगावत ,हनुमंत वाबळे , धनाजी थोरात यांनी मनोगतात इंदापूर तालुक्यावर सोलापुर जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी यांच्याकडून अन्याय झाल्याचे सांगितले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर , तक्रारवाडी गावाचे सरपंच सतीश वाघ ,सचिन बोगावत, इंदापूर बाजार समिती सदस्य आबासो देवकाते ,काका वाबळे , जिजाराम पोंदकूले अजिंक्य माडगे ,विष्णू देवकाते , शरद चीतारे ,संदीप वाकसे ,सतीश शिंगाडे ,राजेंद्र देवकाते यांच्यासह मदनवाडी , पिंपळे ,पोंधवडी , शेटफळ गावच्या शेकडो शेतकरी बांधवांनी एकत्र येत रास्ता रोको करून आंदोलन केले.
यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी जीवन माने यांनी पोलीस पथकासह चोख बंदोबस्त ठेवला होता.