दिलासा आणि प्रेरणा देणारी बातमी ; ११० वर्षाच्या आजीने केली कोरोना वर मात

0
241

भिगवण वार्ताहर,.दि.३०

आयुष्याच्या जीवनपटलावर शतकी खेळी पूर्ण करीत जागतिक महामारीला पराजित करण्याच्या पराक्रम करणाऱ्या लक्ष्मीबाई मुळे कोरोना रुग्णांना लढण्याचे नक्कीच बळ मिळणार असल्याची भावना उपचार करणाऱ्या डॉक्टर मंडळीनी व्यक्त केली.तर रुग्ण ठीक होवून घरी जाणे हीच आपण केलेल्या उपचाराची हि सर्वात मोठी पोच पावती असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.

कोरोना झालाय एवढंच समजल तर अनेक जन धास्ती घेतात मात्र त्यांच्यासाठी हि बातमी नक्कीच प्रेरणा दायी ठरणार आहे.लक्ष्मीबाई पंढरीनाथ देवकर वय .११० रा,मूळ.रेडा सध्या भिगवण यांना २१ तारखेला कोरोनाची लक्षण असल्याची जाणीव झाली.यावेळी त्यांनी खचून न जाता भिगवण येथील कोविड सेंटर मध्ये येत कोरोना चाचणी केली.त्यात त्यांना संसर्ग झाल्याचे दिसून आले.मात्र वय जास्त आणि आजार नाव घेतलं तरी धास्ती निर्माण करणारा त्यामुळे नातेवाईक हि गडबडून गेले होते.त्यांना भिगवण कोविड सेन्टरमध्ये उपचारासाठी दाखल करतेवेळी त्यांची ऑक्सिजन पातळी ८५ पर्यंत घसरली होती.मात्र याठिकाणी कार्यरत असणारे डॉ.कैलास व्यवहारे आणि डॉ.गणेश पवार यांनी त्यांना ऑक्सिजन लावीत आवश्यक असणारे ओषध उपचार करीत त्यांना वैदकीय सेवा दिली.

जगण्याची उमेद आणि डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे दोन दिवसातच लक्ष्मीबाई यांची ऑक्सिजन लेवल सुधारली.तर सात दिवसात उपचार करणाऱ्या डॉक्टर मंडळीना लक्ष्मीबाई स्वताच मला आता बरे वाटत आहे मला आता घरी जायचं आहे अस सांगितले. आठव्या दिवशी डॉ.व्यवहारे यांनी लक्ष्मीबाई यांचे रक्ताचे रिपोर्ट पाहून त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेत नातेवाईक यांना पुढील १० दिवस आजीबाईना विलगीकरण करण्यास सांगितले.

आजीबाईंना कोविड सेंटर मधून डिस्चार्ज देते वेळी डॉ.कैलास व्यवहारे ,डॉ. गणेश पवार ,डॉ.अंकिता शिंदे ,कोरोना रुग्णासाठी दिवस रात्र मदत पोहोचविणारे सचिन बोगावत ,अमोल वाघ ,राहुल धांडे ,प्रिया नखाते ,रुग्णवाहिका चालक सुहास पालकर उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here