भिगवण कोविड सेंटर मध्ये होणार ५० ऑक्सिजन बेडची उपलब्धता ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

0
206

भिगवण वार्ताहर.दि.१७

इंदापूर तालुक्यातील कोरोना रुग्णाचा वाढता आलेख कमी करण्याच्या तसेच रुग्णांना तातडीने सेवा मिळावी यासाठी इंदापूर तालुक्याचे आमदार आणि राज्याचे मंत्री दतात्रय भरणे यांनी भिगवण ट्रामा केअर सेंटर इमारती मधील कोविड सेंटर मध्ये आढावा बैठक आयोजित केली होती.या बैठकीला बारामती विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे ,इंदापूर तहसीलदार अनिल ठोंबरे ,जि.प.सदस्य हनुमंत बंडगर ,गट विकास अधिकारी विजय परीट ,तालुका आरोग्य अधिकारी सुनील गावडे ,भिगवण कोविड सेंटर इनचार्ज कैलास व्यवहारे उपस्थित होते .

यावेळी इंदापूर तालुक्यात वाढत असलेल्या रुग्ण संखेबाबत माहिती देण्यात आली .तसेच पोलीस अधिकाऱ्यांना इंदापूर तसेच वालचंदनगर आणि भिगवण हद्दीत येणाऱ्या गावात बेरीगेटिंग करण्याचा सूचना दिल्या.तसेच संचारबंदी आदेशाची काटेकोरपणे पालन करून विणकामाच्या बाहेर फिरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.यावेळी मंत्री भरणे यांनी भिगवण कोविड सेंटर मध्ये मंगळवारी पासून ५० ऑक्सिजन बेड सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.तर रेम्डीसिवीर इंजेक्शन चा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी खबरदारी घेतली जाणार असल्याचे सांगितले.यावेळी इंदापूर नगरपालिका अधिकाऱ्यांना शहरात बेरीगेटींग करण्याच्या सूचना देण्यात आल्या.यावेळी उपस्थित भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे ,माजी सरपंच पराग जाधव आणि पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे ,सचिन बोगावत ,तुषार क्षीरसागर यांनी तपासण्या वाढविण्यावर आणि भिगवण परिसरातील कोविड सेंटर मध्ये इंजेक्शन पुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी केली.तर ऑक्सिजन बेड ची उपलब्धता तातडीने सुरु करण्याची मागणी केली.यावेळी या आढावा बैठकीला सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता आर,एल,चौधरी स्थापत्य अभियंता ए.ए.कावडे ,इंदापूर तालुका पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे ,वालचंदनगर स.पो.नि दिलीप पवार ,भिगवण स.पो.नि जीवन माने तसेच महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते .

भिगवण कोविड सेंटर मध्ये मंगळवारी २० तारखेपासून ५० ऑक्सिजन बेडची उपलब्धता होणार असल्याची राज्यमंत्री भरणे यांची ग्वाही

इंदापूर तालुक्यातील कोरोना हॉस्पिटल मध्ये रेमडीसिवीर इंजेक्शनचा पुरवठा आवश्यकतेनुसार होणार असल्याची राज्यमंत्री भरणे यांची माहिती

संचारबंदी नियम काटेकोर पणे पाळण्याची गरज असल्याचे सांगून पोलिसांनी यावर कारवाई करण्याची गरज असल्याचे भरणे यांचे आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here