भिगवण वार्ताहर . दि.१६
तक्रारवाडी गावातील अतिक्रमणाचा वाद पोलीस ठाण्याच्या दरवाजात पोहोचला असला तरी याची दखल ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामसेवक घेताना दिसून येत नसल्यामुळे तक्रारदार न्यायालयाचे दरवाजे ठोठवनार असल्याची माहिती संबंधिता कडून देण्यात आली.अतिक्रमणावर अंकुश ठेवण्यासाठी कोणतेच प्रशासन कार्यवाही करत नसल्यामुळे अतिक्रमण करणारांची मानसिकता वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारवाडी गावातील सबंधित प्रकरण असून गावातील 238 मिळकत नंबर चे भोगवटा दार राजेंद्र गोडसे यांनी त्यांच्या मिळकत समोरील रस्त्यावर अतिक्रमण काढण्यासाठी काही दिवसापूर्वी प्रशासनाला अनेक विनंती अर्ज केले होते.मात्र प्रशासनाने न्याय देण्यास विलंब केल्याने त्यांनी आमरण उपोषण केले होते.त्यावेळी जागे झालेल्या प्रशासनाने आणि ग्राम विस्तार अधिकारी यांनी तक्रारदार गोडसे आणि अतिक्रमण करणाऱ्या शरद वाघ , युवराज काळंगे तसेच इतर ४ नागरिकात तडजोड करीत १० फुटाचा रस्ता मालकी असणाऱ्या मिळकत दार राजेंद्र गोडसे यांना दिला होता. तस पाहिलं तर गट विकास अधिकारी होत असलेल्या अतिक्रमणावर निर्बंध घालणं गरजेचं होत परंतु राजकीय दबावामुळे गट विकास अधिकारी यांनी अतिक्रमणाला मुक पाठिंबा दिल्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाडस वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे.यातूनच जागा मालकाला स्वतःच्या जागेवर येण्या जाण्याच्या रस्त्यावर पक्के बांधकामास सुरवात करण्यात आली आहे.तसेच याबाबत मूळ जागा मालकाने आपणाला आणि पत्नीला शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिल्या बाबत भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.मात्र आठ दिवस उलटूनही यावर कोणतीही कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याचे गोडसे यांचे म्हणणे आहे.तर ग्रामसेवक यांना वरिष्ठ कार्यालयाचे आदेश मिळूनही अतिक्रमणावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे दिसून येतं आहे.तर अतिक्रमण करणारे कोणत्याही नोटीस ला घाबरत नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे साहजिकच तक्रार दाराला न्यायालयाचे दरवाजे ठोठावन्याची वेळ आली असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत तक्रारदार राजेंद्र गोडसे यांनी बोलताना ग्रामसेवक आणि तक्रारवाडी गावाचे सरपंच यांनी अतिक्रमण रोखणे गरजेचे असताना आणि ग्रामसेवक यांची जबाबदारी असताना यावर कोणती ही कारवाई केली जात नसल्याचे सांगितले.तसेच याविषयी आपण न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. तसेच प्रशासन अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरत असल्याने गावातील सर्वच जागा अतिक्रमणाच्या घशात चालल्या असल्याचे सांगितले.
याबाबत ग्रामसेवक दीपक बोरावके यांनी अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस देवून बांधकाम थांबविण्यासाठी सूचना केल्या असल्याचे सांगितले.
याबाबत तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतिक्रमण होत असलेली जागा गावच्या नकाशाच्या बाहेर येत असल्याची माहिती दिली.तर या अतिक्रमण बाबंत हद्दीचा विषय येत असल्याने कोणतीही कारवाई केली नसल्याचे सरपंच वाघ यांनी म्हणणे मांडले.