भिगवण वार्ताहर.दि.२५
इंदापूर तालुक्या मध्ये लक्षवेधी ठरलेल्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांनी स्मशानभूमीच्या स्वच्छते पासून कामकाजाला सुरवात करत अनेक गावांसाठी आदर्श निर्माण करण्याचे काम केले.यावेळी सर्व निर्वाचित सदस्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवीत भिगवण गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
इंदापूर तालुक्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत वर राष्ट्रवादीची सत्ता ५ वर्षापासून होती.तत्कालीन निवडून आलेल्या पदाधिकारी यांनी निवडून येताच हातात झाडू घेत भिगवण गाव कचर्यापासून मुक्त करण्यासाठी चंग बांधला होता.मात्र काही काळात पदाच्या अपेक्षेमुळे ऐकित बेकी होत चांगल्या आणि महत्वाकांक्षा असणाऱ्या कामांना ब्रेक लागला .राष्ट्रवादी पक्षाला खो देत विरोधकांनी एकत्र येत भिगवणची सत्ता पुन्हा मिळविण्यात यश मिळविले.दिवंगत नेते रमेश जाधव यांच्या प्रेरणेतून उभ्या केलेल्या पार्टीला नागरिकांनी १ नंबरची पसंती देत १७ पैकी १६ जागेवर उमेदवारांना निवडून दिले.याच नागरिकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि भिगवण गाव स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांनी एकत्र येत स्मशानभूमीत स्वच्छता करीत आपल्या कामकाजाला सुरवात करीत दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पित केली.यावेळी पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे ,पार्टी प्रमुख अशोक शिंदे , पराग जाधव ,तुषार क्षीरसागर ,सत्यवान भोसले,जयदीप जाधव ,दत्ता धवडे ,हरिश्चंद्र पांढरे ,तानाजी वायसे ,गुरापा पवार उपस्थित होते.
यावेळी अशोक शिंदे तसेच पराग जाधव यांनी संपूर्ण स्मशानभूमीचा कायापालट करण्यात येणार असल्याचे सांगितले.शासकीय निधी आणि लोकवर्गणीतून वॉलकंपाउंड ,पेव्हर ब्लॉक ,पाण्याची व्यवस्था आणि झाडांची लागवड केली जाणार असल्याचे सांगितले.