प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गर्भवती महिलांसाठी डोहाळे जेवण ;कुपोषित बालकांना बोर नहान

0
424

भिगवण वार्ताहर.दि.२२

भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उप केंद्र तक्रारवाडी येथे गर्भवती महिलांसाठी डोहाळेजेवण तसेच कुपोषित बालकांसाठी बोरनहाने सारखा आगळावेगळा कार्यक्रम राबविण्यात आला.यावेळी तक्रारवाडी ,भिगवण आणि पोंधवडी गावच्या महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्र तक्रारवाडी येथील आरोग्य कार्यालयाच्या पटांगणात हा कार्यक्रम घेण्यात आला.सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप यांच्या कल्पकतेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आलेल्या सर्व महिलांचे हिमोग्लोबिन तसेच इतर आरोग्याच्या तपासण्या करण्यात आल्या..यावेळी आर्थिक बाबतीत गरीब असलेल्या एका गर्भवती महिलेला डोहाळेजेवण देण्यात आले.तसेच उपस्थित बालकांचे बोरनहान करण्यात आले.तर उपस्थित गर्भवती मातांना बालकांना पोषक आहार ,फळे आणि मल्टी विटामिन गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब भिगवणच्या अध्यक्षा मीनाताई बंडगर ,मदनवाडी गावच्या सरपंच आम्रपाली बंडगर ,तक्रारवाडी गावच्या नवनिर्वाचित सदस्या मनीषा वाघ ,प्राजक्ता वाघ ,गौरी पिसाळ ,स्मिता वाघ ,सुरेखा पिसाळदेशमुख तसेच अनेक किशोरवयीन मुली कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.यावेळी उपकेद्राच्या वतीने उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावून स्वागत करण्यात आले.१५० च्या वर महिलांनी या कार्यक्रमात भाग घेतला.यावेळी किशोरवयीन मुलीना सेनेटरी नेफकीन तसेच मल्टीविटामिन गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here