भिगवण वार्ताहर.दि.२१
अल्पवयीन मुलीला पल्सर मोटार सायकल ने अडवीत आपल्या मित्रांना हे माझ सामान आहे.तिच्याकडे कोणी पाहू नका आणि तु माझ्या गाडीवर बस तुला घेवून जातो असे म्हणून मुलीच्या मनात लज्जा उत्पन होईल असे वर्तन केल्यामुळे दोन आरोपी विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणी उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
याबाबत भिगवण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी याबाबत तक्रार दिली आहे.संचित उर्फ बंटी संजय सलगर ,शुभम संजय देवकाते दोन्ही रा.मदनवाडी ता.इंदापूर यांनी फिर्यादी यांच्या मुलीला पल्सर गाडीवरअडवून तिच्याकडे पाहत आपल्या मित्रांना हे माझ सामान आहे.हिच्याकडे कोणी पाहू नका.तसेच तिच्या नावाचा उल्लेख करीत चल बस मी तुला गाडीवर घेवून जातो असे मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.तसेच मुलीने याला प्रतिसाद दिला नाही म्हणून पल्सर गाडी घेवून मुलीच्या घरासमोर जावून होर्न वाजविला.वेळोवेळी होत असलेल्या या त्रासामुळे मुलीच्या वडिलांनी भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.याप्रकरणी संध्याकाळी उशिरा पर्यंत कोणालाही अटक केली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.सदर गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक दडसपाटील करीत आहेत.
भिगवण शहर हे महिला मुलीच्या बाबतीत नेहमीच संवेदनशील म्हणून ओळखले गेले आहे. पोलीस अधिकारी यांच्या सिंघम कारवाया मुळे अनेक रोड रोमिओ ची धुलाई केल्या नंतर काही दिवस असे प्रकार थांबतात आणि विसर पडताच पहिले पाढे पंचावन अशी अवस्था निर्माण होते.नेहमीच्या त्रासाला कंटाळून अनेक मुलींचे शिक्षण थांबल्याचे प्रकार हि उघडकीस आलेले आहेत.त्यामुळे भिगवण पोलिसांनी अशा प्रकरणी तिसरा डोळा उघडण्याची आणि नागरिकांनी यात कोणतीही राजकीय तडजोड न करण्याची गरज निर्माण झाली आहे.नाहीतर मुली वाचवा मुली शिकवा हि बाब फक्त म्हणी पुरतीच वापरली जाईल याचा विचार होणे गरजेचे आहे .