अनेक तरुणांना यातून चढावी लागली पोलीस ठाण्याची पायरी
भिगवण वार्ताहर . दि.२०
” लबाड बोलतंय लबाड बोलतंय . कारखान्यावर लावतो कामाला लावतो !५ वर्ष झाली पगारी नाहीती आणि काय म्हणतय कामाला लावतो. काय इलेक्शन आल्यावरच कामाला लावतो काय ? ” असा सोशल मीडिया वर व्हिडिओ फिरत असून या मॅसेज ने तरुणांना आकर्षित करीत असल्याचे निवडणुकीच्या काळात दिसून आले. तर यामुळे अनेक तरुणांना पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागल्याचे पहावयास मिळाले.
या निवडणुकीत सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणावर स्टेटस ठेवून प्रचार करण्यात आला असल्याचे निर्दशनास आले.
निवडणूक आणि पार्टीचा प्रचार म्हणाले की आश्वासनाची खैरात करणे उमेदवारांना क्रमप्राप्त आणि ठरलेलच .मग यातून दिल्या जाणाऱ्या आश्वासनाची पूर्तता होवू अथवा न होवो.याच बरोबर ‘ ‘ हव्वा कोणाची र हववा आपलीच र ‘ सारखे अनेक स्टेटस पहावयास मिळाले. ‘ गडी बारका आहे पण समोरच्याला बी कळलं मोठा आहे ‘.असे एक ना अनेक प्रकारचे स्टेटस निवडणुकीच्या काळात धूम ठोकत असल्याचे दिसून आले.तर निवडणुक संपताच ‘ घासून नाहिर ठासून आला भल्या भल्याचा वांदा केला ‘. ‘भल्याची पुण्याई उभी तुझ्या माग .’तू चाल पुढं तुला र गड्या भीती कुणाची आन परवा भी कशाची अशा स्टेटस् नी धुमाकूळ घातला असल्याचे दिसून आले.काही स्टेटस मुळे तर तरुणांना पोलीस ठाण्याची वारी करावी लागली तर काही ठिकाणी अशा स्टेटस मुळे वादाचे प्रसंग निर्माण झाल्याचे दिसून आले.
याबाबत ज्येष्ठ पत्रकार दादा थोरात यांनी बोलताना समाज माध्यम दुधारी हत्यार आहे त्याचा कोणी कसा वापर करायचा हे ज्याचे त्याने ठरवले पाहिजे, समाज माध्यमातून चांगल्या गोष्टींचा प्रचार करता येतो तसा वाईट गोष्टींचाही करता येतो आणि याच बाबींचा विचार करता माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरणाऱ्या युवकांनी या हत्याराचा वापर समाज प्रबोधनासाठी केला पाहिजे मात्र ग्रामीण भागात याचा वापर ग्रामपंचायत निवडणूकीसाठी होताना दिसले असे मत व्यक्त केले.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी सत्य वार्ता शी बोलताना सांगितले निवडणुक ही चार दिवसाची असते आणि समाज नेहमी सुखा दुःखात सोबत राहत असतो . कोणताही स्टेटस हा आनंद देणारा असावा आणि त्यातून समाजासाठी चांगला मॅसेज जावा ही अपेक्षा असते मात्र यातून दुसऱ्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जात असतील तर अशा स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे.तर काहींना या प्रकरणी नोटीस दिलेल्या आहेत.अजूनही अशा काही स्टेटस असल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.