भिगवण वार्ताहर.दि.१९
तक्रारवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सताधारी पार्टीला धूळ चारत सर्वपक्षीय पॅनल ७ जागांवर विजय मिळविला.सत्ताधारी पॅनलने २ जागेवर उमेदवार निवडून आणण्यात समाधान मिळविले.ग्रामपंचायत निवडणुकतील विजय हा गोर गरीब जनतेचा विजय असल्याचे मत यावेळी माजी उपसरपंच प्रशांत वाघ यांनी मांडले.
इंदापूर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या तक्रारवाडी गावात सत्ताधारी पार्टीच्या विरोधात सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्र येत हि निवडणूक लढवली होती.” नेत्यावर प्रेम तर गावातील राजकीय पुढार्याच्या कारवाया नी त्रस्त ,” झालेला पाटील यांचा एक गट हि यात सत्ताधारी पार्टी विरोधात मैदानात उतरला होता.तीन प्रभागात लढविण्यात आलेल्या निवडणुकीत १ ल्या प्रभागात सर्वपक्षीय तीनही उमेदवार निवडून आले.तर दुसऱ्या प्रभागात ३ पैकी ३ उमेदवार विजयी झाले.तर प्रभाग तीन मध्ये सत्ताधारी पार्टीच्या २ आणि सर्वपक्षीय पार्टीच्या १ जागा विजयी झाल्या.प्रभाग १ मध्ये सतीश विनायक वाघ ,,मंदाकिनी संजय मोरे ,राणी नितीन काळंगे हे सताधारी पार्टीच्या राजेंद्र सीताराम वाघ ,ज्योती युवराज काळंगे,पुष्पा गणेश गजरे यांचा पराभव करीत विजयी झाले.तर प्रभाग २ मध्ये अविनाश रामचंद्र धुमाळ ,प्राजक्ता सचिन वाघ ,मनीषा प्रशांत वाघ हे सताधारी पार्टीच्या विलास गडकर ,अश्विनी अमोल वाघ ,रोहिणी अविराज वाघ यांचा पराभव करीत निवडून आले.तर ३ प्रभाग मध्ये सताधारी पार्टीच्या २ आणि सर्वपक्षीय १ असे एकूण ९ पैकी ७ जागांवर सर्वपक्षीय पार्टीने विजय मिळवीत ग्रामपंचायती वर आपला झेंडा रोवला आहे.
सर्वपक्षीय विचारांच्या माध्यमातून हि निवडणूक लढविण्यात आली असल्याने भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याकडे जाण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे पॅनल प्रमुखांनी घोषित केले आहे.
