
कळस प्रतिनिधी सचिन राजेभोसले दि.१९
कळस ग्रांमपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, त्यामुळे राष्ट्रवादिच्या नेत्यांनी केलेल्या विकासकामाच्या जोरावरती जनतेला पुन्हा एकदा सत्ता देण्यासाठी साद घातली होती. त्यास जनतेने साथ देत १५ जागांपैकी १२ जागांवर विजय मिळवत ग्रांमपंचातीवर एक हाती सत्ता प्रस्थापित केली. तर भाजप पुरस्कृत श्री हरणेश्वर ग्राम परिवर्तन पॅनलच्या नेत्यांनी सत्ताधार्यांनी कोणतीही विकास कामे केली नसून त्यांच्या काळात भ्रष्टाचार झाला असे म्हणत जनतेला कौल मागितला पण जनतेने त्यांना साफ नाकारले.
भाजप पुरस्कृत पॅनलला स्थानिक पातळीवर अाश्वासक चेहरा नसल्यामुळे देखील फटका बसल्याच बोलले जात आहे. श्री हरणेश्वर ग्राम विकास पॅनलचे प्रमुख नेते प्रतापराव पाटील, बाबा महाराज खारतोडे,भरतराजे भोसले यांनी सर्व विजयी व पराभूत उमेदवार तसेच कार्यकर्ते व जनतेचे मनापासून आभार मानले .
पुढील पाच वर्षे ग्रांमपंचायतीचा कारभार राज्य मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे जाहीर केले.