इंदापूर तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी ८० टक्के मतदान झाले असून, भिगवण स्टेशन येथे उच्चांकी ८५ टक्के मतदान झाले आहे. एकूण १७ जागेसाठी ४३ उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. दि.१८ रोजी मतमोजणी होणार असून भिगवणकर नक्की कोणाच्या बाजूने कौल देतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत भिगवण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळत होते.
भिगवण ग्रामपंचायतीची निवडणूक ही अनेक कारणांनी गाजली. प्रचाराची खालावलेली पातळी, मोठ्या प्रमाणात झालेले लक्ष्मी दर्शन तर, काही ठिकाणी झालेल्या वादविवादाच्या घटना. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या निवडणूक प्रक्रियेमध्ये सक्रीय झालेला पाहायला मिळाले. दोन्ही बाजूकडून विजयाचा दावा करण्यात येत असला असला तरी खरे चित्र हे १८ तारखेला समजणार आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर श्रीनाथ ग्रामविकास पॅनलचे प्रमुख अशोक शिंदे यांनी सर्व भिगवणकर नागरिक आणि प्रशासनाचे आभार मानत कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहान केले.सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी भिगवण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून देखील मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात आली होती.
- दोनही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून आपलीच सत्ता येणार असल्याचे बोलले जात आहे .
- सत्ताधारी आपण केलेल्या विकासकामांच्या जोरावर हमखास निवडून येणार असल्याचे सांगत आहेत
- विरोधी गटाकडून मतदार विजयाची माळ आपल्या च गळ्यात टाकणा र असल्याची ग्वाही देताना दिसून येत आहे.