भिगवन शेटफळगडे जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ची उडी;तालुका अध्यक्ष शरद चितारे यांची माहिती

0
450

भिगवण वार्ताहर . दि.२८

इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्या बरोबर च आता वंचित बहुजन आघाडी ने उडी घेत निवडणुकीत रंगत वाढवली आहे .
भिगवण- शेटफळ गढे जिल्हा परिषद गटातील ९ ग्रामपंचायत निवडणुका इतर समविचारी संघटनांना बरोबर घेऊन लढणार असल्याचे वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष शरद चितारे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.

यावेळी बोलताना शरद चितारे यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा मानणाऱ्या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्या विरुद्धची ही लढाई आहे. अनेक वेळा दोन्ही पक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला जात नसून, निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचे काम हे दोन्ही पक्ष करीत आहेत त्यामुळे अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये संधी देण्यात येणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्व प्रभागात उमेदवार उभे करणार असल्याचे देखील घोषित केले. यावेळी भिगवण मधील प्रभाग २ मधून हेमंत निंबाळकर व अमोल पाचांगणे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. व भादलवाडी येथून नितीन पिसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली.
” आपला जाहीरनामा हा सर्व सामान्य नागरिकाच्या हिताचा असेल असे सांगितले.पिण्याचे पाणी रस्ता आणि शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिक यांच्या पर्यंत पोहोचविणे प्रथम काम असेल असे चीतारे यांनी सांगितले.”

या पत्रकार परिषदेसाठी हेमंत निंबाळकर, अमोल पाचांगणे, संदीप वाघमारे, महेश चितारे, विजय धवडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार परिषदेचे आयोजन वंचित आघाडी यांच्या वतीने शरद चीतारे यांनी केले.यावेळी नितीन पिसे यांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here