भिगवण ग्रामपंचायत समोरील अपघातग्रस्त यू टर्न तातडीने बंद करण्याची मागणी…….

0
417

भिगवण वार्ताहर. दि.५


पुणे-सोलापूर महामार्गावरील भिगवण ग्रामपंचायत समोरील बंद केलेली यु टर्न पुन्हा सुरू केल्याने याठिकाणी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रविवारी याचा प्रत्यय आला असून मराठा क्रांती मोर्चा रास्ता रोको साठी मोठा पोलिस बंदोबस्त याठिकाणी असतानासुद्धा एका दुचाकीस्वाराला भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती व्हॅन ने जोराची ठोस दिली.

या अपघाताचा आवाज इतका जोरात होता की नक्की हा मोठा अपघात असण्याची शक्यता वर्तवली जात होती बंदोबस्त असणारे पोलीस अधिकारी रियाज शेख यांनी क्षणाचीही उसंत न लावता या ठिकाणी धाव घेतली .आणि अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला उचलण्यासाठी मदत केली .या अपघातग्रस्त दुचाकीस्वाराचे नशीब बलवत्तर आहे म्हणूनच की काय त्याला त्याला कोणत्याही प्रकारचे गंभीर प्रकारच्या जखमा न होता किरकोळ जखमा झाल्याचे दिसून आले .

अपघात घडला त्या ठिकाणी अशी वर्दळ होत असते यातूनच जीवित हानी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघ तसेच पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख यांनी यात अपघातग्रस्ताला तातडीने मदत मिळवून देत उपचारासाठी दवाखान्यात पाठवले.

या अपघाताची कोणी तक्रार केली नसल्याचे गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. मात्र भविष्यात या ठिकाणी मोठा अपघात कोण जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेली चार वर्ष अपघातामुळे बंद केलेला हा यू-टर्न महामार्ग प्रशासनाने दुरुस्तीच्या नावाखाली चालू केला आहे . हा यू-टर्न चालू असताना अनेक अपघात घडले आहेत यात अनेकांचे जीव गेलेले आहेत याची जाणीव असताना महामार्ग प्रशासन सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

अपघातग्रस्त ठिकाणचा हा यू-टर्न हटवल्यामुळे अपघात होऊन कोणाचा जीव गेला तरी याची जबाबदारी सर्वस्वी रस्ते दुरुस्त करणाऱ्या कंपनी वर टाकण्यात यावी. अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी केली आहे.

तर महामार्ग महामार्ग प्रशासनाने याठिकाणी अंडरपास ब्रीज ची निर्मिती केली तर भविष्यात होणारे अपघात कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here