मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आमदार खासदार आणि मंत्री यांच्या घरासमोर आक्रोश आंदोलन

0
352

भिगवण वार्ता.दि.२


मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आमदार खासदार आणि मंत्री यांच्या घरासमोर आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे.आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी हे आंदोलन करण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपन प्रयत्न शील असल्याची ग्वाही देताना राज्यमंत्री भरणे

यावेळी समाजाचे निवेदन स्वीकारीत स्वतः राज्यमंत्री भरणे हेच आंदोलन कर्त्या सोबत बसल्याचे दिसून आले.तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हे सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती भरणे यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना दिली.


मराठा समाजाला त्यांचे हक्काचे आरक्षण मिळावे म्हणून मराठा क्रांती मोर्चा आक्रोश मोर्चाचे आयोजन करीत राज्यातील आमदार खासदार आणि मंत्र्याच्या घरासमोर ढोल बजाव तसेच ठिया आंदोलन करीत आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ,राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आली आहेत.

मराठा समाजाच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेत ठिय्या आंदोलन करताना राज्यमंत्री भरणे

आज राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर हे आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी भरणे यांनी स्वतः या आंदोलनात सहभाग घेत मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे ,मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा पाठींबा असून मराठा समाजाची भूमिका आपण सरकार दरबारी ठामपणे मांडणार असल्याचे सांगितले.

तर महाविकास आघाडी सरकार आरक्षणासाठी प्रयत्नशील असून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राज्याचे मंत्री उद्धव ठाकरे ,आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरक्षणासाठी पाठपुरावा असल्याचे सांगितले.अशोक चव्हाण आरक्षणाचा विषय हाताळत असून न्यायालयात भूमिका मांडण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.
यावेळी मंत्री भरणे यांनी स्वतः आंदोलनात सहभाग नोंदवीत निवेदनाचा स्वीकार केला आणि समाजाच्या भावना सरकार दरबारी पोहोचविणार असल्याचे सांगितले.

मराठा समाजाचे निवेदन स्वीकारीत असताना भरणे आणि मराठा समाज बांधव


आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी भरणे यांच्या निवासस्थानी जाणाऱ्या सर्वच मार्गावर पोलीस प्रशासनाने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता.बारामती उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर ,इंदापूर पोलीस ठाण्याचे पी .आय नारायण सारंगकर ,वालचंदनगर ए.पी.आय दिलीप पवार ,भिगवण पोलीस स्टेशनचे ए.पी.आय जीवन माने जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here