धनगर समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची सरकारची भूमिका-आ. दत्तात्रय भरणे

0
343

भिगवण वार्ताहर.दि.२७
धनगर समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची भूमिका सरकारची असून या दोन्ही समाजाला न्याय मिळावा यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचे दत्तात्रय भरणे यांनी भिगवण येथे बोलताना सांगितले.

तसेच भटक्या मेंढपाळांना स्वताच्या रक्षणासाठी शस्त्र परवाना मिळाला पाहिजे अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली असल्याचे यावेळी सांगितले.


राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पुणे दौऱ्यावर निघाले असताना भिगवण येथील गिरीजा भारत गॅस कार्यालया धनगर बांधवांनी धनगर आरक्षण आणि मेंढपाळ यांच्यावरील हल्या संदर्भात निवेदन दिले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर ,प्रताप पाटील ,तुकाराम बंडगर ,नानासाहेब बंडगर ,नामदेव पाटील ,अनिकेत भरणे ,धनाजी थोरात ,तुषार हगारे ,दादासाहेब थोरात उपस्थित होते.यावेळी बोलताना भरणे यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि यासाठी सरकारचा प्रयत्न चालू असल्याचे सांगितले.तर धनगर आरक्षणाबरोबरच मराठा समाजाला हि आरक्षण मिळाले पाहिजे असे मत व्यक्त केले.

तर काही राजकीय पक्ष आणि व्यक्ती समाजा समाजात भांडणे लावून देवून आपली राजकीय पोळी भाजत असल्याचे सांगितले.यावेळी मेंढपाळ यांना आपली स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळावा यासाठी आपण गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली असून लवकरच मेंढपाळ यांना न्याय देण्याचे काम सरकारच्या माध्यमातून निश्चित केले जाईल असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here