भिगवण वार्ता.२५

भिगवण पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलेल्या अॅट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्ह्यातील इतर ४ आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी तक्रारदार अशोक भास्कर भोसले यांनी बारामती उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात दि.१२ /०९ /२०२० रोजी डाळज नंबर ता.इंदापूर येथील अॅट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील तक्रारदार अशोक भास्कर भोसले यांच्यावर आरोपी प्रदीप दौलत जगताप ,अमोल सुभाष जाधव ,हनुमंत शिवाजी जगताप ,रोहन तानाजी जगताप ,रोहित तानाजी जगताप सर्वजण रा.डाळज यांच्यावर मारहाण केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.यावेळी मुख्य आरोपी प्रदीप दौलत जगताप याला भिगवण पोलिसांनी अटक केले होते.

त्याची न्यायालयने सदर आरोपीस जामीन देत असताना संदर्भीय केसचा निकाल लागे पर्यंत त्याच्या राहत्या गावी म्हणजे डाळज येथे जाता येणार नसल्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता.

मात्र भिगवण पोलिसांनी इतर ४ आरोपींना १० दिवस उलटूनही अटक करण्यात आली नाही.त्यामुळे फिर्यादी भोसले यांनी बारामती उविभागीय अधिकारी शिरगावकर यांची भेट घेत आरोपींच्या अटकेची मागणी केली.

तसेच मुख्य आरोपी हा रात्रीच्या वेळेत प्रतिबंध केलेल्या राहत्या घरी येत असल्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली.तसेच यातील आरोपी हे गावात राजरोष पणे फिरत असून त्यांना पोलीस प्रशासनाने तातडीने अटक करून न्याय देण्याची मागणी भोसले यांनी केली आहे

याबाबत वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शरद चीतारे यांनी आरोपींच्या अटकेची मागणी करीत तातडीने अटक न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे सांगितले.तर अॅट्रासिटी सारख्या संवेदनशील गुन्ह्यात पोलिसांनी घेतलेल्या नरमाईच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here