भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने ९०० पेक्षा जास्त नागरिकांना अल्पदरात वाफेचे मशीन

0
436

भिगवण वार्ता.२५
भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने ९०० च्यावर नागरिकांना अल्पदरात वाफेचे मशीन देण्यात आली.वाफेच्या मशीनची अजूनही नागरिकांनी मागणी केल्यास ती ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच प्रतिनिधी आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी संतोष धवडे यांनी दिली.

भिगवण आणि परिसरात कोरोना आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत.भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी जनजागृती केली जात आहे.तर अनेकवेळा फवारणी करण्यात आली आहे.

भिगवण शहरात आजाराचा फैलाव वाढू नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने खबरदारीचे उपाय योजना करण्यात आल्या आहेत.तर नागरिकांना अन्नधान्याची आणि भाजीपालाची कीट हि राष्ट्रवादीच्या वतीने वाटण्यात आली आहे.याचाच एक भाग म्हणून भिगवण गावच्या सरपंच अनिता धवडे यांनी नागरिकांना वाफेचे मशीन कमी किमतीत उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामपंचायत आणि भिगवण गावातील काही दानशूर व्यक्ती आणि संघटना यांच्या मदतीने प्रयत्न केले.आणि त्यांच्या प्रयत्नाला मोठ्या प्रमाणावर यश लाभून भिगवण गावातील जवळपास ९०० नागरिकांना अगदी नाममात्र १०० रुपये किमतीत वाफेचे मशीन उपलब्ध करण्यात आले.

या वाफेचे मशीन वितरणाच्या वेळी सरपंच अनिता संतोष धवडे ,माजी उपसरपंच प्रदीप वाकसे ,प्रशांत भाऊ शेलार ,माजी सरपंच पराग जाधव ,हेमाताई माडगे ,संदीप वाकसे ,रेखाताई पाचागने तसेच सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी हनुमंत चांदगुडे ,अमोल वाघ ,बाळासाहेब जगताप ,नाना गायकवाड तसेच ग्रामविकास अधिकारी परदेशी उपस्थित होते.

भिगवण शहरात कोरोना आजाराचा फैलाव होवू नये यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी सामुहिक अथक प्रयत्न केल्यामुळेच भिगवण येथील रुग्णाची संख्या मर्यादित राहिली.

मात्र भिगवण परिसरात अनेक गावातील वाढत्या रुग्ण संखेमुळे कोविड सेंटर मध्ये उपचार आणि विलगीकरण यांची संख्या वाढलेली दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here