भिगवण वार्ताहर .दि .18

संधी समजून काम केलं पाहिजे  नेहमी म्हटल जात मात्र कोरोणा सारख्या वैश्विक महामारीच्या संकटाला संधी समजून काम करणाऱ्या एका शेतकऱ्याने लाखो रुपयांचे केळीचे उत्पन्न घेऊन प्रत्यक्षात आणले आणि इतर शेतकऱ्यांच्या समोर देखील एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

इंदापुर तालुक्यातील मदनवाडी गावच्या तुकाराम बंडगर यांनी आपल्या शेतात केळीचे पीक घेत लाखो रुपये कमावले .

याबाबत बंडगर यांनी माहिती सांगताना केळी सारखे जास्त पाण्याचे पीक घेण्याअगोदर सर्व समस्यांचा अभ्यास केला केळीला सुरुवातीलाच होणारी हुमनी केळी मध्ये निर्माण होणारे गवत आणि फळांच्यावर बसणारे मच्छर यापासून बचाव व्हावा यासाठी सुरुवातीलाच पूर्ण नियोजन केले . सात बाय पाच या अंतरावरती  जैनची j९ जातीच्या केळीच्या रोपांची लागवड केली असून साधारण साडे बाराशे रूपे एकरामध्ये लागवड केली आहे पंधरा रुपये प्रमाणे रोपे विकत घेतली आहेत पाणांना हिरवी आळी लागु नये आणि मुळ कुज होउ नये यासाठी औषध फवारणी केली औषध खर्च कमीत कमी केला आहे मात्र फुटवे काढण्यासाठी मजुरांना वेळच्यावेळी खर्च केला आहे .    

खतांचे व्यवस्थापन केल्याने केळी जोमदार आली आहे बारामती एग्रोचे जैविक खत वापरले आहे याच बरोबर ०:५२:३४ या खतांचा वापर विन चालू होत असताना केला १३:०:४५ वापरले आहे यानंतर शेवटच्या टप्प्यात पॉटॅश या रासायनिक खतांचाही वापर केला असल्याची माहिती दिली .

केळी पिकाला सुरुवातीपासून साधारण दीड लाख रुपये एकरी खर्च अपेक्षित आहे यामुळे किलोला चार ते पाच रुपये खर्च बसतो केळीच्या लागवडीपासून रुपये मशागत खत बियाणे कामगार यावरती वेळच्या वेळी खर्च केल्यानंतर केळीला चांगला बाजार मिळाला तर केळीतून साधारण साडेतीन ते साडेचार लाख रुपये नफा मिळू शकतो याचे उत्तम उदाहरण तुकाराम बंडगर यांचे आहे दोन वर्षापुर्वी साडे पाच एकर लागन केली होती  यातुन बाविस लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले तर यावर्षी सतरा एकर केळीची लागवड केली आहे  निर्यातक्षम केळी असुनही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री केली आहे.

केळीचे पीक चांगलं येण्यासाठी शेणखताचा वापर केला आहे साधारण एकरी सहा ट्रेलर शेणखत वापरले आहे याबरोबरच ड्रिप मधून रासायनिक खतांचा वापर केला आहे शेणखताला पन्नास हजार रुपये खर्च केला आहे तर ड्रीप मधील खातांना वीस ते बावीस हजार रुपये खर्च केला आहे त्यामुळेच केळीला चांगला जोम बसतो असं देखील यावेळी तुकाराम बंडगर यांनी सांगितले. 

पीक व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्यांनी सर्वाधिक खर्च खातांच्यावरती केला पाहिजे यानंतर गवत नष्ट करण्यासाठी सर्व अधिक प्रयत्न केले पाहिजे आणि केळी पिकामध्ये केळीचे फुटवे वेळच्यावेळी काढले तर नक्कीच उत्पादन वाढायला मदत होते असे देखील बंडगर यांनी सांगितले .पाण्याच्या व्यवस्थापनासाठी ड्रिपची सोय केली आहे रोपांच्या दोन्ही बाजूला ड्रिप टाकली असून यामधून खते देखील दिली जातात केळी पिकाला आवश्‍यक पाणी मिळावे यासाठी २० डिस्चार्ज असलेली पाईप वापरायला हवी शासनाच्या अनुदानाची वाट न पाहता शेतकऱ्यांनी पिकाचे पाणी व्यवस्थापन केले पाहिजे शासन अनुदान देत असताना अनेक त्रुटी ठेवत असते यामुळे शासकीय अनुदानाची वाट न पाहता पीक व्यवस्थापन करावे आणि शेतकर्‍याने आपल्या सोयीने पाण्याची व्यवस्था करावी असे देखील बंडगर पाणी व्यवस्थेबद्दल बोलताना सांगितले. 

एक एकरामध्ये साडेबाराशे रोपांची लागवड केली आहे एका रोपाला ४० ते ५५ किलो पर्यंत केळी लागत आहे एकरात सरासरी ४५ किलो प्रमाणे साडेबाराशे रोपांना सरासरी ४० टन  केळीचे उत्पादन काढण्यात यशस्वी झाले आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केळीला बाजार मिळत नसल्याने व्यापारी मनमानी भावाने खरेदी करत आहेत तरीही बंडगर यांना ७ ते ९ रुपये दर मिळाल्याने एकरी ४ लाख रुपये मिळाले असल्याची माहिती दिली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here